Maharashtra
निता गायकवाड यांच्या तत्परतेमुळे लोणावळा येथील जिवीत हानी टळली

अण्णाभाऊ साठे वसाहत लोणावळा येथे नुकतीच वस्तीमध्ये झाडावर आग लागल्या मुळे जीवित हानी होण्याची शक्यता होती लोणावळा नगरपालिकेने आगीचा बंब पाठवून तीन तासाने आग आटोक्यात आणली परंतु ते झाड जळून अर्धे झाल्याने वस्तीमध्ये पडण्याची शक्यता होती तेंव्हा निता गायकवाड यांनी नगरसेविका आरोही तळेगावकर व उमेश तळेगावकर यांना हि सूचना दिली त्यांनी त्वरित माणसे पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली व नगरपालिकेचे कामगार पाठवून झाड व्यवस्थित कापून काढले कुठलीही हानी होऊ दिली नाही नगरपालिकेचे कर्मचारी बाळू दळवी, जितेंद्र राऊत, सुभाष सुभाष बलकवडे चेतन सारवाण, क्रेन चालक कय्युम भाई उमेश तळेगावकर यांचा सत्कार तेथील रहिवाशी सचिन गायकवाड ,जयराम कदम, मनोज खुडे, गौतम गजरमल, राहुल रोकडे यांनी केला.
Total Page Visits: 10 - Today Page Visits: 1