Breaking NewsMaharashtra

बालाजी जिनिंग तर्फे शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची लूट…

या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खासगी जिनिंग व्यापाऱ्याकडून लयलूट सुरू आहे गरजेपोटी शेतकरी खाजगी व्यापार्‍याला कापूस विक्री करीत आहेत.

सुख दुःख वा कुठल्याही खाजगी कामा करिता शेतकऱ्याचे मात्र हमीभावापेक्षा कमी दराने मंठा तालुक्यातील जिंतूर रोड वरील जिनिंग कमी दराने कापसाची खरेदी करीत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषण करीत असल्यामुळे या अनागोंदी कारभार याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

यंदा सीसीआय बालाजी जिनिंग तर्फे शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची खरेदी चालू आहे. परंतु काही घरगुती गरजा अडचणीमुळे नगदी व्यवहाराकडे बालाजी जिनिंग कडे शेतकरी वर्ग वळतो पण कुठेही शेतकऱ्यांचे शोषण करून शेतकऱ्याची उघड्या डोळ्याने लूट करण्यात येत आहे.

तालुक्याचे बहुतांश पीक हे पांढरे सोने परंतु शेतकर्‍यांच्या गरजेचा फायदा घेत खासगी जिनिंग व्यापारी पांढर्‍या सोन्याला कवडीमोल दराने घेत असून पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल पांढऱ्या सोन्याला दर असताना देखील त्यांची पिळवणूक केली जात असून कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंग वर कारवाई करण्याची शेतकर्‍यांतून बोलले जात आहे.

Total Page Visits: 32 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!