Breaking NewsCorona UpdatesHealth & EducationMaharashtraState

सातारा जिल्हा 51 हजार 500 समीप

अमर बेंद्रे : सातारा प्रतिनिधी

काळजी घेणे जरुरीचे, मास्क वापरणे गरजेचे
● मृतांचा टक्का होतोय कमी
● वातावरण सावरू लागले असले तरीही लशीच्या आगमनाची प्रतीक्षा
● रात्रीच्या अहवालात 144 बाधित
● 106 जणांना डिस्चार्ज

2020 या वर्षातील शेवटच्या महिन्यातील पहिला दिवस.पहिल्या दिवशी जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा हा 51 हजार 225 वर सकाळी होता तर रात्री आलेल्या अहवालात 144 वाढ होऊन 51 हजार 500 च्या समीप बाधितांजवळ पोहचला आहे.कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे, नियम पाळणे जरुरीचे बनले आहे.मृतांचा टक्काही आता कमी होत असून जिल्हावासीयांनी कोरोनावरील लशीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
सातारा जिल्ह्यातील आजपर्यंत 2 लाख 49हजार9 जणांचे स्वाब तपासण्या झाल्या आहेत.त्यात आज सकाळपर्यंत 51हजार 225 एवढे बाधित होते.तर उपचार घेऊन बरे झालेल्या 48हजार 693 जणांना सकाळपर्यंत घरी सोडण्यात आले.तर आज दिवसभरात 106 जणांना घरी सोडले. आजपर्यंत1हजार719 जणांचे बळी कोरोनाने घेतले असून आज एक जण बळी गेला आहे.813रुग्ण उपचारार्थ आहेत.डिसेंबर हा वर्षांचा शेवटचा महिना आहे.गेली सव्वा नऊ महिने कोरोनाने अक्षरशः नको नको केले.सुरुवातीला कडक लॉक डाऊन अन नंतर ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान जिल्ह्यात वाढलेला कहर. या आठवणी अंगावर शहारे प्रत्येकाच्या आणतात.आता जरी कोरोनाचा विळखा सैल झाला असला तरी पूर्णपणे गेलेला नाही.त्यामुळे सातारा, माण, खटाव, फलटण या तालुक्यातील बाधितांचा आकडा दोन आकड्यात आहे तर वाई, महाबळेश्वर, पाटण, कराड, कोरेगाव, खंडाळा हे तालुके सावरू लागले आहेत.वर्षाच्या शेवटच्या महिन्यात चांगल्या वार्ता कानी पडू दे यासाठी प्रत्येकांनी आपल्याला नियम पाळणे अजून गरजेचे आहे.जोपर्यंत यावर लस निघत नाही तोपर्यंत जरा काळजी घेतली पाहिजे, असेच प्रत्येकाला वाटू लागले आहे.

106 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 106 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 305 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

305 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 33, कराड येथील 22, फलटण येथील 17, कोरेगांव येथील 14, वाई येथील 18, खंडाळा येथील 12, रायगांव येथील 17, पानमळेवाडी येथील 50, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 12, खावली येथील 44 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 61 असे एकूण 305 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

1 बाधितांचा मृत्यु
खासगी हॉस्पीटलमध्ये विहे ता. पाटण येथील 77 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

मंगळवारी जिल्ह्यात
बाधित 144
मुक्त 106
मृत 1
तपासणी 305

मंगळवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने -249009
एकूण बाधित -51369
घरी सोडण्यात आलेले -48693
मृत्यू -1719
उपचारार्थ रुग्ण-957

Total Page Visits: 144 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!