तबला वादक साठी सोनई मध्ये ज्ञान प्रसाद तबला मेकर

कमलेश शेवाळे : प्रतिनिधी
अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे ज्ञान प्रसाद तबला मेकर या नुतन व्यवसायाचा भव्य शुभारंभ संत महंतांच्या उपस्थितीत सोनई येथे संपन्न ह भ प गुरुवर्य पंढरीनाथ महाराज तांदळे व ह भ प विश्र्वास मामा गडाख यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या प्रसंगी ह भ प कारभारी महाराज पंडित ह भ प रामेश्वर जी महाराज शास्त्री देवीदास महाराज आडभाई ह भ प राम महाराज खरवंडीकर अभिषेक महाराज जाधव शिवप्रसाद महाराज पंडित बाजीराव नाना जाधव लतीफ महाराज शेख सचीन महाराज पवार पंडित सर विलास महाराज खाटीक अहमदनगर जिल्हा वारकरी मंच जिल्हा समन्वयक संभाजी गवळी आदीनाथ पाटील दहातोंडे बद्रीभाऊ सोनवणे किशोर महाराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते ह भ प कैलास महाराज फलके यांनी सर्वांचे स्वागत केले व ह भ प दिपक महाराज फलके यांनी आभार मानले