Breaking NewsMaharashtra

बेपत्ता बोट व त्यातील ४ व्यक्तींचा शोध घेण्यास सातपटी पोलिसांना यश

दि.२८ नोव्हेंबर २०२०
पालघर प्रतिनिधी- नदीम शेख

सातपाटी: पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२० गुरुवारी सकाळी मासेमारी करिता आत समुद्रात गेले असताना बेपत्ता झालेल्या ‘अग्निमाता’ या मासेमारी बोट व त्यातील ४ व्यक्तींना दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर शोधण्यास अखेर सातपाटी पोलिसांना यश मिळाले आहे.
गुरुवारी मासेमारी साठी सातपाटी येथून समुद्रात गेलेल्या अग्निमाता नावाच्या बोट व त्यातील खलाशी हे मासेमारी करून संध्याकाळी पुन्हा सातपाटी गावात परतणे अपेक्षित होते. परंतु समुद्रात बोटीच्या इंजिन बंद पडल्यामुळे त्यांना येतं आलं नाही, तसेच त्यांच्या जवळ वायरलेस यंत्रणा व मोबाईल फोन नसल्याने त्यांना कुठे ही सम्पर्क करता आलं नाही. त्यामुळे परत न आल्याने त्या बोटीवरील व्यक्तीच्या एका नातेवाईकांनी सातपाटी पोलीस ठाण्यात कळविले. नंतर सातपाटी पोलीसांनी लगेच शोध घ्यायची सुरुवात केली व सातपाटी गावातील प्रत्येक बोटवाल्यांना सदर बाबतीत विचारपूस केल्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी सातपाटी येथून ४ मासेमारी बोटी सदर बोटीचा शोध लावण्यासाठी रवाना केले. तेव्हा आज सकाळी १० वाजता सदर ‘अग्निमाता’ बोट व त्यातील व्यक्ती समुद्रात ०९ नॉटिकल अंतरावर सुखरूप आदळून आले, मग त्यांना व त्यांची बोटीला गेलेल्या बोटीच्या सहाय्याने सातपाटी गावात सुखरूप परत आणण्यात आलं आहे. सदर कारवाई सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Total Page Visits: 13 - Today Page Visits: 1

Gourav Butte

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!