पिंपरी चिंचवड शहरातील शाळा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद

पिंपरी चिंचवड-प्रतिनिधी
राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सोमवरपासून इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याबाबत शिक्षण मंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थानी निर्णय घ्यावा असे सांगितले आहे, त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा ३० नोव्हेंबर नंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थी सुरक्षेची हमी, पालकांचे संमतीपत्राबद्दलची शाशंकता असल्यामुळे यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेने शाळा डिसेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली असताना शासनाच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा विरोधही झाला.
मात्र, शासनाने मुलांना शाळेत पाठविण्याची कोणतीही सक्ती करण्यात येणार नसल्याचे सांगितले होते.
ऑनलाईनही शिक्षण सुरु असल्यामुळे पालकांनी फारसा विरोध दर्शविला नाही. पण पालक कितपत मुलांना शाळेत पाठवितील याबाबत शंका होती.
शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची कोविड चाचणी व शाळांचे सॅनिटायझेशन सुरु आहे. शाळा सुरु करण्याबाबत सारखेच निर्णय बदलत असल्यामुळे सर्वजण संभ्रमावस्थेतच होते. त्यामुळे २३ नोव्हेंबर ला शाळा उघडण्याचा निर्णयाबाबत चर्चा सुरू होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.