तपासण्या वाढल्या : स्वयंभान हवेच

अमर बेंद्रे : सातारा
शनिवार दि. 21 वेळ रात्री 10 वाजता
● शाळा सुरू होणार असल्याने पालकांच्या मनात धाकधूक शिक्षकांच्या टेस्ट झाल्या
● दिवसभरात मृतांचा आकडा 8 तर 232 जणांना डिस्चार्ज
● रात्री उशिरा 166 नव्याने बाधित आढळून आले
नुकताच दिवाळीचा सण झाला आहे. या सणाला अनेकजण बाहेर पडले होते. गर्दीत फिरत होते.काळजी घेणे गरजेचे आहे. आता तपासण्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सवयभान गरजेचे आहे. कोरोना बाधित रुग्णाची संख्या आतापर्यंत 49 हजार 599 वर पोहचली आहे. आज दिवसभरात नव्याने 166बाधित आढळुन आले असून 8 जणांचा बळी गेला आहे. 232 जणांना डिस्चार्ज दिला आहे. दोन दिवसांनी शाळा सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी स्वब तपासणी करून घेतली.
सध्या देशभरात कोरोनाचे प्रस्थ काही प्रमाणात वाढत चालल्याचे दिसत आहे. दिल्लीत तर रात्रीचे फिरायला बंदी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात दुसरी लाट येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वारंवार नागरिकांना आवाहन केले जात आहे. मास्क वापरा, सोशल डिस्टनन्स पाळा म्हणून पण काही ठिकाणी बोजवारा उडत आहे. शनिवारी तपासण्या वाढविण्यात आल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसते. दि.23पासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत वर्ग सुरू होणार असल्याने त्यापार्श्वभूमीवर शिक्षकांच्या स्वाब तपासणी करण्यात आले आहेत. शाळा निर्जंतुक फवारण्या करून घेण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियम पाळा असे आवाहन केले आहे.कोरोना पुन्हा फोफाऊ नये म्हणून प्रत्येकांनी काळजी घेणं बंधनकारक आहे, असे आवाहन प्रशासन करत आहे.
प्रचारादरम्यान उडतोय सोशल डिस्टन्सचा फज्जा
सातारा जिल्ह्यात सध्या पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीच्या अनुषंगाने मेळावे, बैठका सुरू आहेत. यामध्ये राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. मास्क तर तोंडावर घेतल्याचे आणि नाक उघडे ठेवल्याचे दिसते.अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे गेले आहेत काही कार्यकर्ते बरे होऊन पुन्हा गर्दीत मिसळत आहेत.त्यामुळे फज्जा उडत असल्याचे दिसुन येत आहे.
मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई केव्हा?
कोरोनाने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अनेकांची वाताहत झाली आहे.तरीही काही नागरिक कोरोना गेल्यासारखे वागत आहेत. मास्क वापरत नाहीत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश दिले असले तरी मास्क न वापणाऱ्यावर कारवाई केव्हा होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
232 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 232 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 349 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
349 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, कराड येथील 11, फलटण येथील 14, कोरेगांव येथील 35, वाई येथील 40, खंडाळा येथील 77, रायगांव येथील 4, पानमळेवाडी येथील 17, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 11, ,खावली येथील 3, म्हसवड येथील 17, पिंपोडा येथील 12, तरडगांव येथील 16 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 71 असे एकूण 349 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
8 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये चिंचणेर ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, मलवडे ता. माण येथील 80 वर्षीय महिला, कासारशिरंबे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, उडतारे ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटमध्ये संभाजीनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, ताडदेव मुंबई येथील 78 वर्षीय परुष, पुसेगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशीरा कळविलेले कराड येथील 58 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
शनिवारी
बाधित…..166
मुक्त…. 232
मृत…. 8
तपासणीला 548
शनिवार पर्यंत
एकूण नमुने -229400
एकूण बाधित -49732
घरी सोडण्यात आलेले -47053
मृत्यू -1678
उपचारार्थ रुग्ण-1001
अचूक बातमी महाराष्ट्र प्रसची