Breaking NewsCrimeMaharashtraState
शेतीच्या वादावरून चुलत्याचा मांडव्यात निर्घृण खून

जालना : प्रतिनिधी
जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील शेतकरी रतन गिरजाजी खंडाळे (65) आणि त्यांच्या पुतण्यामध्ये शेतीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे.
आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास रतन खंडाळे हे शेतात जात असताना, त्यांना रस्त्यात अडवून दोन पुतण्यानी काठीने मारहाण केली. डोक्यात काठीचा मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले.
घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी पाठविला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले असून, दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
Total Page Visits: 40 - Today Page Visits: 1