औरंगाबादेत मंदिर उघडली मात्र सुप्रसिद्ध सिद्धार्थ उद्यान पर्यटकांसाठी बंदिस्तच

औरंगाबाद – प्रतिनिधी
जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले सिद्धार्थ उद्यानाला पर्यटकांसाठी खुले करण्याचा महानगरपालिकेला मुहूर्त सापडेना. चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले झालं त्याच्यापाठोपाठ काल राज्यातील मंदिरही सर्वांसाठी खुली करण्यात आली. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात असलेल सुप्रसिद्ध सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय अद्यापही बंदच आहे.गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या सिद्धार्थ उद्यानामुळे औरंगाबाद महानगर पालिकेला कोटी रुपयाच्या महसूलाला कोरोना मूळे खीळ बसली. याचा मोठा आर्थिक फटका औरंगाबाद महानगरपालिकेला बसला आहे.आज गरज आहे ती महानगरपालिकेला आर्थिक बळ मिळण्याची आणि अधिकतम महसूल प्राप्ती होण्याची याकरिता विशेष खबरदारी घेत सिद्धार्थ उद्यानाची दारं पर्यटकांसाठी खुली करनं महानगरपालिकेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र अद्यापही सिद्धार्थ उद्यान बंद असल्याने महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे