संपादक – महेश सारणीकर
गौरव नारायणराव बुट्टे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती जिल्हा जालना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की, माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय महासचिव मा.गोविंद भावे व समस्त विभाग आघाड्यांच्या मार्गदर्शिका मा. अमृताताई भंडारी आणि मा. प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनात व महेश सारणीकर महाराष्ट्र राज्य सचिव यांच्या शिफारशीने राष्ट्रीय समाजवादी विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही समाजवादी संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे. संबंधित नियुक्तीस संस्थापक अध्यक्ष अभिजित आपटे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक कांबळे, राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे, प्रभारी प्रवक्ता तथा राज्य सचिव महेश सारणीकर, राज्य सचिव गणेश शिंदे, राज्य उपाध्यक्ष तुळशीराम जांभूळकर, राज्य उपाध्यक्ष पुष्कर सराफ, सरचिटणीस वजीर शेख, सरचिटणीस निजाम पटेल यांच्या मार्गदर्शनाने गौरव नारायणराव बुट्टे यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यांच्या नियुक्तीबद्दल स्तरातील सहकारी वर्ग, मित्रपरिवार व नातेवाईक तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.