शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नांतील महाराष्ट्र मुखमंत्री साकारत आहेत माजी मंत्री अर्जुन खोतकर

जालना जिल्हा प्रतिनिधी – गौरव बुट्टे
शेतकरी कर्ज मुक्त व्हावा, शेतीस मुबलक पाणी, वीज, खते मिळावी, महिलांचे संरक्षण, संकटांत गरजवंतांना आधार, पर्यटन वाढीस चालना, सर्वसामान्य माणूस सर्वार्थाने सक्षम होऊन बलशाली महाराष्ट्र निर्माण व्हावा हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने वर्षभरात राबवलेल्या जनकल्याण कारी योजना व लोकहितांच्या निर्णयांतून साकार होत आहे. असा विश्वास शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त मंगळवारी ( ता. १७) माजी नगरसेवक जगन्नाथ चव्हाण आणि शिवसेनेच्या वतीने चंदनझिरा भागातील हनुमान मंदिर सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या प्रसंगी उद्दघाटन करतांना श्री.खोतकर बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, माजी नगरसेवक जगन्नाथ चव्हाण, उपशहरप्रमुख प्रभाकर पवार, बबनराव थोरात, रितेश पंचारिया, विभाग प्रमुख जगदीश रत्नपारखे, राजू गायकवाड, संतोष रासवे, राम गाडेकर, प्रमोद पवार, सचिन सहाने, जफर खान, सय्यद सलमान यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.